Ratnagiri: वडिलांना घेवून दुचाकीवरुन निघाला, अन् टेम्पोला धडकला; तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 13:35 IST2023-07-26T13:33:01+5:302023-07-26T13:35:50+5:30
खेड तालुक्यातील धामणी येथे झाला अपघात

Ratnagiri: वडिलांना घेवून दुचाकीवरुन निघाला, अन् टेम्पोला धडकला; तरुण जागीच ठार
खेड : टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खेड तालुक्यातील धामणी येथे मंडणगड मार्गावर मंगळवारी (२५ जुलै) सायंकाळी हा अपघात झाला. रोहित राजेंद्र बिरवटकर (२१, रा. पोयनार आलाटीवाडी, ता. खेड) असे त्याचे नाव आहे.
मंडणगड येथून सिमेंट उतरवून टेम्पो (एमएच ०४, केएफ ९८६५) खेडच्या दिशेने येत हाेता. त्याचवेळी रोहित बिरवटकर दुचाकीवरुन खेडहून पालगडच्या दिशेने जात हाेता. धामणी येथे रोहितच्या दुचाकीने टेम्पोच्या उजव्या बाजूला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, डोक्याला गंभीर दुखापत होऊन रोहीत जागीच ठार झाला.
दुचाकीवर मागे बसलेले त्याचे वडील राजेंद्र बिरवटकर जखमी झाले. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.