Ratnagiri: सेल्फी काढण्याच्या नादात कोल्हापूरच्या तरुणाने गमावला जीव
By अरुण आडिवरेकर | Updated: April 17, 2025 19:29 IST2025-04-17T19:28:38+5:302025-04-17T19:29:15+5:30
गणपतीपुळे : सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात ताेल जाऊन पडलेल्या काेल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ...

Ratnagiri: सेल्फी काढण्याच्या नादात कोल्हापूरच्या तरुणाने गमावला जीव
गणपतीपुळे : सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात ताेल जाऊन पडलेल्या काेल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी भंडारपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. इरफान झाकीरहुसेन जमादार (३४, रा. हेरले, ता. हातकणंगले, काेल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
इरफान झाकीरहुसेन जमादार हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत बुधवारी दुपारी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. देवदर्शन करून ते आरे-वारे मार्गे कोल्हापूरकडे निघाले हाेते. याच मार्गावर गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे गावातील एका हॉटेलजवळील समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते. ताे समुद्रातील खडकावर उभे राहून सेल्फी काढत हाेता.
सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि ताे समुद्राच्या पाण्यात पडला. त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले हाेते. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या मृत्यूची नोंद जयगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.