नाेकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेचार लाखाचा गंडा

By अरुण आडिवरेकर | Published: November 14, 2023 04:46 PM2023-11-14T16:46:48+5:302023-11-14T16:47:14+5:30

अमित मिश्रा, महेंद्र तिवारी आणि कंपनीचा एच. आर. (पूर्ण नाव गाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल केलेले संशयित आहेत.

A young man was cheated of four and a half lakhs by luring a job | नाेकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेचार लाखाचा गंडा

नाेकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेचार लाखाचा गंडा

रत्नागिरी : नोकरीच्या शाेधात असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल ४ लाख ५६ हजार २२५ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पूर्णगड पाेलिस स्थानकात तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा  दाखल  करण्यात आला आहे.

अमित मिश्रा, महेंद्र तिवारी आणि कंपनीचा एच. आर. (पूर्ण नाव गाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल केलेले संशयित आहेत. याबाबत अभिषेक वीरेंद्र सुर्वे (रा. रनपार, रत्नागिरी) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार हा प्रकार ४ ऑक्टाेबर २०३ ते १० नाेव्हेंबर २०२३ या कलावधीत घडला आहे. अभिषेक हा खासगी नाेकरी करताे. त्याने नाेकरीच्या शाेधासाठी इंन्डीड जाॅब सर्च ॲप डाउनलाेड केले हाेते. हा ॲप उघडून पाहिला असता त्याला रायगड जिल्ह्यातील डाेलवी-पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीत नाेकर भरतीची जाहिरात दिसली. त्याने ऑनलाइन बेसिक अर्ज भरुन कंपनीला पाठविला. त्यानंतर अमित मिश्रा याने फाेन करुन कंपनीचे इन्स्टुमेंट मेन्टनस डिपार्टमेंट आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे नाेकरी पाहिले असेल तर दाेन पगार एच. आर. ला द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर अभिषेकने दिलेल्या बॅंक खात्यात ४,५६,२२५ रुपये पाठविले.

त्यानंतर अभिषकने आपल्या मित्रामार्फत कंपनीशी संपर्क साधून माेबाइलवर आलेल्या कंपनीच्या जाहिरातीबाबत खात्री केली. त्यावेळी हे सर्व बाेगस असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिषक सुर्वे याने पूर्णगड पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून १३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young man was cheated of four and a half lakhs by luring a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.