आंबात शिवशाहीला अपघात; सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:22 PM2019-02-26T12:22:09+5:302019-02-26T12:25:35+5:30
कोल्हापूरहून रत्नागिरीला निघालेल्या शिवशाही बसला आंबा गावाजवळ डंपरने ठोकरले. सोमवारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले.
आंबा/साखरपा : कोल्हापूरहून रत्नागिरीला निघालेल्या शिवशाही बसला आंबा गावाजवळ डंपरने ठोकरले. सोमवारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले.
बसचालक रमेश पवार यांनी अपघाताची शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली. यातील जखमीची नावे पूजा शशिकांत लांजेकर (२४), अश्विनी शशिकांत लांजेकर (२६, दोघीही लांजा, जिल्हा रत्नागिरी), मारूती बंडू घाटे (५०, ठाणे), उज्ज्वला दिलीप कांबळे (५८, उंब्रज), मीना कीर्तिकुमार वाघमारे (५७, पुणे), आकाश राजू भोसले (२१, विटा), वेदिका दीपक साळुंखे (१२, कऱ्हाड) अशी असून, जखमींच्या चेहऱ्यावर व मानेवर काचांचे तुकडे पडून जखमा झाल्या आहेत.
रत्नागिरी आगाराची पुणे - रत्नागिरी बस (एमएच ४७, वाय ०३०७) आंब्याहून घाटाकडे निघाली असता, रत्नागिरीकडून भरधाव आलेला डंपर शिवशाही बसच्या चालकाकडील बाजूला घासत खिडकीच्या काचा फोडत निघून गेला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला.
बसचे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे मलकापूर आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले. आंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना प्रत्येकी एक हजाराचे सहाय्य एस. टी.ने केले.