वेरळ घाटामध्ये कंटेनरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:29+5:302021-09-25T04:34:29+5:30

लांजा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन कलंडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ...

Accident to container in sparse valley | वेरळ घाटामध्ये कंटेनरला अपघात

वेरळ घाटामध्ये कंटेनरला अपघात

Next

लांजा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन कलंडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ३ वाजता वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर घडली. गेल्या दाेन महिन्यांत या ठिकाणी कंटेनरचे ६ अपघात झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटातील यू आकाराचे वळण हे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यू आकाराच्या वळणावर दोन महिन्यांच्या कालावधीत कंटेनरचे एकूण सहा अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊन या महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर ऑगस्टमध्ये दोन छोटे किरकोळ अपघात झाले होते.

शुक्रवारी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा वेरळ येथील अवघड वळणावर वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू होती. वेरळ घाटातील या वळणावर सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

Web Title: Accident to container in sparse valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.