आंबेनळी घाटात खेडमधील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:52 PM2019-11-09T15:52:28+5:302019-11-09T15:54:01+5:30

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या खेड तालुक्यातील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. ही मिनी बस एका आंब्याच्या झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

Accident on the mini bus of Varkaris in village in Ambenli Ghat | आंबेनळी घाटात खेडमधील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात

आंबेनळी घाटात खेडमधील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेनळी घाटात खेडमधील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघातदिवाण खवटी येथील १९ प्रवासी जखमी

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या खेड तालुक्यातील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. ही मिनी बस एका आंब्याच्या झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

खेड तालुक्यातील दिवाण खवटी गावातील १९ वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे निघाले होते. पोलादपूर - महाबळेश्वर - वाई - सुरूर या मार्गावरून आंबेनळी घाटातून त्यांची चालक नितेश सावंत हे मिनीबस (एमएच ०४, एफएक्स १६३२) ही पोलादपूर तालुक्यातील आड कुंभळवणे गावादरम्यान तीव्र वळणावर आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली.

या अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये सहादेव विठू साळवी, गंगाराम गणपत साळवी, शिवाजी शेलार, जयवंती गंगाराम साळवी, शेखर काशीराम कदम, महादेव तुकाराम साळवी, परशुराम बाळाराम कदम, देवजी गोपाळ साळवी, वसंत साळवी, प्रतिभा कदम, प्रणाली साळवी, शांता साळवी, प्रमिला साळवी, पार्वती साळवी, चंद्रभागा कदम रोहिणी काजारे, अनिता काजारे, तुकाराम काशिराम काजारे आधी १९ प्रवासी जखमी झाले.

पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तातडीने जखमींवर उपचार करण्यात आले. या उपचारानंतर सहदेव साळवी, पार्वती साळवी, शांता साळवी, प्रतिभा कदम, आणि चालक नितेश सावंत यांना गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले.

पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिंडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ग्रामीण रूग्णालयामध्ये जखमींकडून अपघाताची माहिती घेण्यात आली.

Web Title: Accident on the mini bus of Varkaris in village in Ambenli Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.