कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, अपघातात एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 12:29 PM2021-12-20T12:29:24+5:302021-12-20T12:59:47+5:30

थंडीचा कडाका वाढल्याने गेल्या काही दिवसापासून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Accident on Mumbai Goa highway One person was injured | कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, अपघातात एक जण गंभीर जखमी

कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, अपघातात एक जण गंभीर जखमी

Next

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. रामचंद्र लक्ष्मण कदम (वय-६२, रा. बोरिवली, मुंबई) असे या जखमीचे नाव आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्यासमोर आज,सोमवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून मुंबईच्या दिशेने जाणारी ह्युंदाई क्रेटा कारने (एमएच ४७, बीबी १५७७) महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला (जीजे २५, टी ९४०७) पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारमधील रामचंद्र कदम हे या गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

थंडीचा कडाका वाढल्याने गेल्या काही दिवसापासून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री पडलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका व मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले.

Web Title: Accident on Mumbai Goa highway One person was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.