Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:43 AM2024-01-04T11:43:42+5:302024-01-04T11:44:40+5:30

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील ...

Accident to traveler in khed; Ten people injured | Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. बुधवारी, दि. ३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक शैलेश संपत बिरामणे (३२, रा. मुंबई) हा ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ६९०१) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी ट्रॅव्हलरमध्ये संगीता नितीन रायचुरा (५४), अंजली सतीश सबसुळे (५२), संगीता ओमप्रकाश गोंधळे (४७), देवांशी जितेंद्र ठाकूर (१२), चेतना बाबालाल ठाकूर (४३), नितीन रायचुरा (५६), जितेंद्र लालसिंग ठाकूर (४४), सतीश विठ्ठलराव सबसुळे (५८), ओमप्रकाश गंगाराम गोंधळे (६०, सर्व रा. अमरावती) हे प्रवासी होते.

हे प्रवासी प्रथम मुंबईमध्ये आले. तेथून ते गोव्याला गेले. बुधवारी ते मुंबईच्या दिशेने परत निघाले असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील तुळशी ते खवटी गावांदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व क्षणार्धात चारपदरी रस्त्यामधील दुभाजक ओलांडून ट्रॅव्हलर पलीकडच्या बाजूला जाऊन कठड्यावर धडकली. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना डोके, हात, पाय, छातीला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णवाहिकांची मदत

शासनाची १०८ सेवा, शिवतेज आरोग्य सेवा संस्था, शिवसेना, प्रसिद्धी रुग्णवाहिका, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान नाणिजची रुग्णवाहिका यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्या.

मदतीसाठी अनेकजण पुढे

या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिलिंद काते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली व त्यांना मदत केली.

तज्ज्ञांअभावी फक्त मलमपट्टीच

कळंबणी येथे असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा प्रकर्षाने जाणवत होती. या ठिकाणी एकही ऑर्थोपेडिक सर्जन नसल्यामुळे मलमपट्टी करण्याखेरीज कोणतेही उपचार जखमींना मिळाले नाहीत.

Web Title: Accident to traveler in khed; Ten people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.