होडकाड प्रौढाचा खूनप्रकरणी केवळ ६ तासात आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:23 AM2020-08-27T11:23:40+5:302020-08-27T11:25:43+5:30

खेड तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून नारायण शिगवण या प्रौढांचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे.

Accused in Hodkad adult murder case disappeared in just 6 hours | होडकाड प्रौढाचा खूनप्रकरणी केवळ ६ तासात आरोपी गजाआड

होडकाड प्रौढाचा खूनप्रकरणी केवळ ६ तासात आरोपी गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देहोडकाड प्रौढाचा खूनप्रकरणी केवळ ६ तासात आरोपी गजाआडखेड पोलिसांची कामगिरी, माही श्वानाची महत्वाची भूमिका

खेड : तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून नारायण शिगवण या प्रौढांचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे. रुपेश शिगवण (२६) असे आरोपीचे नाव असून, तो त्याच गावातील आहे. आरोपीला पकडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातील 'माही' या श्वानाने महत्वाची भूमिका बजावली. पैशांच्या देवाण-घेवाणावरून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

होडकाड वरचीवाडी येथील नारायण शिगवण या ५० वर्षीय प्रौढांचा मंगळवारी रात्री खून झाला होता. पोलिसांना त्याचा मृत्यूदेह होडकाड एस.टी. स्टॉप पासून ५० मीटर अंतरावर जंगलमय भागात आढळला होता. पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. या कामी पोलिसांनी रत्नागिरी पोलीस दलातील 'माही' या श्वानांची मदत घेतली होती.

नारायण शिगवण यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता. त्याठिकाणी 'माही'ला नेल्यानंतर 'माही'ने थेट आरोपीचे घर गाठले होते. तिथेच पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. पोलिसांनी तत्काळ या घरातून रुपेश शिगवण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशी दरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खास पोलिसी पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर त्याने नारायण शिगवण यांच्या डोक्यात, गुप्तांगावर, तोंडावर काठीने प्रहार करून त्यांना ठार मारल्याची कबुली दिली. या हत्येमागेचे कारण पैशांची देवाण-घेवाण असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

पोलिओमुळे अपंग असलेले नारायण शिगवण हे गाव व परिसरातील नागरिकांना आवश्यक असणारे शासकीय दाखले काढून देणे, पंचायत समिती, महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे करून देत असत. आरोपी रुपेश यांच्याकडूनही त्यांनी त्याच्या आजोबांचा दाखल काढून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले होते.

चार वर्ष उलटून गेली तरी नारायण शिगवण यांनी रुपेश याला हवा असलेला दाखल दिला नव्हता. नोकरीसाठी मुंबईला असलेला रुपेश हा लॉकडाऊनमुळे सध्या गावी आला आहे. गावी आल्यापासून त्याने नारायण शिगवण यांच्याकडे दाखल्यासाठी भुणभुण लावली होती. मात्र, नारायण यांनी त्याच्याकडे पुन्हा ४ हजार रुपयांची मागणी केली.

दाखल्याची आवश्यकता असल्याने रुपेश याने नारायण यांना आणखी ४ हजार रुपये दिले. मात्र, तरीही रुपेश याला दाखल मिळाला नाही. मंगळवारी रुपेश आणि नारायण यांची होडकाड एसटी स्टॉप येथे गाठ पडली. तेव्हा रुपेश याने नारायण यांना दाखल्याबाबत विचारले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

या दरम्यान रुपेश याचा राग अनावर झाल्याने त्याने हातातील काठीने नारायण यांच्यावर प्रहार केला. हा प्रहार नारायण यांच्या वर्णी बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रुपेश याने नारायण यांना एस. टी. स्टॉप वरून ओढत जंगलमय भागात नेले. इथेही त्याच्या गुप्तांगावर आणि तोंडावर काठीने प्रहार केले.

नारायण यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर रुपेश घरी आला. तपासादरम्यान पोलिसांच्या 'माही' श्वानानाने रुपेश याचेच घर पोलिसांना दाखवले आणि रुपेश पोलिसांच्या हाती लागला. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Accused in Hodkad adult murder case disappeared in just 6 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.