साखरप्यात २३ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:57+5:302021-04-18T04:30:57+5:30

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात २३ वाहनांवर कारवाई करून ५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ...

Action taken against 23 people for sugar | साखरप्यात २३ जणांवर कारवाई

साखरप्यात २३ जणांवर कारवाई

Next

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात २३ वाहनांवर कारवाई करून ५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून २ हजार दंड वसुली करण्यात आली.

वाहनांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने सीट बेल्ट नसणे, विनालायसन्स गाडी चालवणे अशा प्रकारची कारवाई दरम्यान दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई लॉकडाऊन कालावधीत साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, पोलीस कर्मचारी तानाजी पाटील, किरण देसाई, प्रशांत नागवेकर, रोहित यादव, महिला पोलीस नाईक अर्पिता दुधाणे, हेमलता गोतावडे, मंगेश फोंडे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांवर कारवाईमुळे जरब बसली असून कारवाईचा धडाका पुढे सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Action taken against 23 people for sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.