गुहागरात तब्बल ६० वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:32+5:302021-04-13T04:29:32+5:30
वीकेंड लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यात पाेलिसांकडून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. (छाया : संकेत गाेयथळे) लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर ...
वीकेंड लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यात पाेलिसांकडून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. (छाया : संकेत गाेयथळे)
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यात गेली दोन दिवस लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्या ३५ वाहनचालकांवर तर विना मास्क फिरणाऱ्या २५ जणांवर गुहागर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
दोन दिवस लॉकडाऊन काळात तालुक्यात नाक्यांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच पोलीस गस्तही चालू होती. लॉकडाऊन असतानाही अनेकजण रस्त्यावर फिरत होते. शृंगारतळी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक जणांवर कारवाई झाली. या दरम्यान मच्छिमारी व विक्रीलाही बंदी असताना रविवार असल्याने अनेक खवय्यांनी गुहागर शहरानजीक असलेल्या असगोली बंदराकडे चोरवाटांनी धाव घेतली मात्र याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवल्याने अनेकजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यावेळी मच्छिमारांनाही पोलिसांनी समज देत हटकले.
३५ वाहनचालकांवर विविध स्वरुपाची दंडात्मक कारवाई करताना प्रत्येक सरासरी २०० रुपयांप्रमाणे तब्बल ७ हजार तर विनामास्क फिरणाऱ्या २५ जणांवर प्रत्येकी २०० प्रमाणे ५ हजार असा एकूण १२ हजार इतकी दंडात्मक रक्कम जमा झाली.