जिल्ह्यात ४२९ कोरोना रुग्णांची भर; २२ जणांच्या मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:09+5:302021-06-09T04:40:09+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात ४२९ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ४०,६२९ इतकी झाली आहे तर एकाच दिवसांत २२ ...

Addition of 429 corona patients in the district; 22 deaths recorded | जिल्ह्यात ४२९ कोरोना रुग्णांची भर; २२ जणांच्या मृत्यूची नोंद

जिल्ह्यात ४२९ कोरोना रुग्णांची भर; २२ जणांच्या मृत्यूची नोंद

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात ४२९ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ४०,६२९ इतकी झाली आहे तर एकाच दिवसांत २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्यांची संख्या १३७८ झाली आहे. त्यात सोमवारी मृत्यू झालेल्यांची संख्या ९ तर उर्वरित १३ अन्य दिवसांतील आहेत.

जिल्ह्यात साेमवारी दिवसभरात ४२९ रुग्ण सापडले. यापैकी अँटिजन चाचणीत १७० आणि आरटीपीसीआर चाचणीत ३०९ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. या २४ तासांत झालेल्या चाचणीत २१४७ जणांचे काेरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,८७,५७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सोमवारी ५५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ३४,७६४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४४८७ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील २२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात संगमेश्वर ४ रत्नागिरी आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि लांजा तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. दोन महिला आणि सात पुरुष रुग्णांचा एका दिवसांत मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी झालेल्या १३ जणांच्या मृत्यूची नोंदही सोमवारी झाली आहे.

जिल्ह्यात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४०,६२९ इतकी असून १३७८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३४,७६४ रुग्ण बरे झाले असून सध्या ४४८७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण १७.८० टक्के तर मृत्यू झालेल्यांची टक्केवारी ३.३९ टक्के इतकी आहे. तसेच बरे होणाऱ्यांची टक्केवारीही वाढत असून ती ८५.५६ टक्के आहे.

Web Title: Addition of 429 corona patients in the district; 22 deaths recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.