बहिणाबाईंसाठी पहिलीच सवलतीची राखी; रत्नागिरीतून मुंबई, ठाणे, पुणे मार्गावर एसटीच्या जादा फेऱ्या
By मेहरून नाकाडे | Published: August 30, 2023 04:59 PM2023-08-30T16:59:11+5:302023-08-30T17:00:13+5:30
अशा सुटणार जादा गाड्या
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभागही रक्षाबंधन सणासाठी सज्ज झाला आहे. रक्षाबंधनाला बहिणीला आपल्या भावाकडे जाता यावे यासाठी मुंबई, ठाणे, नालासोपारा, पुणे, बोरीवली मार्गावरील १८० फेऱ्यांसह अन्य वीस जादा गाड्या चालविण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने ‘महिला सन्मान निधी’ जाहीर केल्यानंतर पहिला रक्षाबंधन सण असल्याने सवलतीची राखी महामंडळाकडून दिली जाणार आहे. रत्नागिरी विभागांतर्गत दैनंदिन ४८०० फेऱ्या धावत आहेत. मुंबई, पुणे, नालासोपारा, बोरीवली, ठाणे मार्गावर १८० फेऱ्या धावत आहेत. या फेऱ्यांना वाढती गर्दी लक्षात घेऊन काही मार्गांवर जादा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या जादा फेऱ्यांची माहिती प्रवाशांना बसस्थानकातून देण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.
अशा सुटणार जादा गाड्या
- मंडणगड-बोरीवली, मंडणगड-पुणे, मंडणगड-मुंबई, मंडणगड- रत्नागिरी, मंडणगड- कोल्हापूर
- दापाेली-रत्नागिरी, दापोली-मुंबई, दापोली-बोरीवली, दापोली-पुणे, दापोली-कोल्हापूर, दापोली-चिपळूण.
- खेड-दापोली, खेड-मुंबई, खेड-बाेरीवली, खेड-पुणे, खेड-रत्नागिरी, खेड-कोल्हापूर.
- चिपळूण-खेड, चिपळूण-पोफळी, चिपळूण-मुबई, चिपळूण-बोरीवली, चिपळूण-पुणे.
- गुहागर- चिपळूण, गुहागर-मुंबई, गुहागर-पुणे, गुहागर-बोरीवली, गुहागर -कोल्हापूर.
- देवरूख- संगमेश्वर, देवरूख- कोल्हापूर, देवरूख-मार्लेश्वर, देवरूख-रत्नागिरी.
- रत्नागिरी-चिपळूण, रत्नागिरी-राजापूर, रत्नागिरी-मुंबई, रत्नागिरी-पुणे, रत्नागिरी-बोरीवली.
- लांजा-कोल्हापूर, लांजा-रत्नागिरी
- राजापूर-रत्नागिरी, राजापूर-मुंबई, राजापूर-बोरीवली, राजापूर-पुणे, राजापूर- कोल्हापूर