झाडगाव केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:31 AM2021-04-27T04:31:53+5:302021-04-27T04:31:53+5:30
या केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. निलोफर डोंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ नर्स रविना लालबिगेख, प्रियांका गडदे, एएमएम रश्मी हळदणकर, सोनाली ...
या केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. निलोफर डोंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ नर्स रविना लालबिगेख, प्रियांका गडदे, एएमएम रश्मी हळदणकर, सोनाली डांगे, विजया चोपडे, डाटा ऑपरेटर पूजा ठीक, शिपाई मनीषा कांबळे आदी लसीकरण मोहिमेची धुरा सांभाळत होत्या. सोमवारी कोविशिल्डची दुसरी लस देण्यात आली. तसेच मंगळवारी कोविशिल्डची पहिली लस १५० लोकांना देण्यात येणार आहे, त्याची आकडेवारी फलकावर लिहिलेली होती.
या केंद्रावर श्रीवल्लभ वणजु, राजेश कांबळे, जयंतीलाल जैन, निखिल घाग, मोहन बापट, जितेंद्र शिगवण प्रदीप सुर्वे, किरण सावंत, सचिन करमरकर, युवराज शेट्ये, शैलेश मुकादम आदी हेल्पिंग हॅंड्सच्या स्वयंसेवकांमुळे गर्दी असूनही नियोजनबद्ध लसीकरण होत आहे. सुरुवातीला थोडासा गोंधळ झाला. मात्र, आता सुरळीत सुरू झाले असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
कोट (फोटो आहे.)
आम्ही सात ते आठ लोकांनी नंबर लावताेय, नोंदणीही झालीय. शेड्यूल पडलेले असतानाही आम्हाला अजून पहिला डोस मिळालेला नाही. डोससाठी किती फेऱ्या मारायच्या?
- प्रकाश जेधे, जे. के. फाईल्स, रत्नागिरी
माझ्या ८२ वर्षीय आईला घेऊन मी लस देण्यासाठी आलेय. शुगर, प्रेशर असलेल्यांना गोळ्या न घेताच लस घेण्यासाठी यावे लागते. मात्र, लससाठी वृद्धांनाही कित्येक तास थांबावे लागते. एकतर आणताना लाॅकडाऊनच्या काळात रिक्षा मिळत नाहीत. वृद्ध माणसांचे फार हाल होतात.
- सुप्रिया वाटैकर, मिरजोळे
कोट
तसं पाहिलं तर सध्या लसचा तुटवडा वरच्या स्तरावर निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी झालीय, शेड्युल पडलयं, त्यांनाही लस मिळत नाही. जिल्हा प्रशासनाचीही लसीकरणाचे नियोजन करताना तारांबळ होतेय. यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक, नोंदणी झालेले आणि नोंदणी न झालेले असे सगळे एकाच छताखाली आणून लसीकरण मोहीम सुरळीत सुरू राहील, यासाठी प्रयत्न करतोय. आमचे प्रयत्न खूप आहेत. मात्र, शासनाकडून लस पुरवठा वेळेवर आणि पुरेसा होणे गरजेचे आहे.
सचिन शिंदे, अध्यक्ष, राजरत्न प्रतिष्ठान (हेल्पिंग हॅंडस, कार्यकर्ता)