कोकण विभागातील नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या
By शोभना कांबळे | Published: April 8, 2023 06:54 PM2023-04-08T18:54:44+5:302023-04-08T18:55:00+5:30
रत्नागिरी : कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून, मंडणगड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब ...
रत्नागिरी : कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून, मंडणगड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांची ठाणे येथे बदली झाली आहे तर चिपळूण येथे उपविभागीय कार्यालयाच्या रिक्त नायब तहसीलदारपदी माणगावचे (ता. रायगड) बाबासाहेब भाबड यांची बदली झाली आहे.
कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार, ६ रोजी मंत्रालयीन स्तरावरून काढण्यात आले आहेत.
मंडणगड तालुक्यात तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय बेर्डे यांची ठाणे येथे रिक्त असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. बेर्डे यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयात काम केले आहे.
तसेच चिपळूण उपविभागीय कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार या रिक्त असलेल्या पदावर माणगाव येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब भाबड यांची बदली झाली आहे. कोकण विभागातील अन्य जिल्ह्यातीलही नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत.