रायपाटण कोविड सेंटरमधील डाॅक्टरांचे काम कौतुकास्पद : अर्जुन नागरगोजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:00+5:302021-07-05T04:20:00+5:30
पाचल : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची रात्र-दिवस सेवा करणाऱ्या रायपाटण कोविड सेंटरमधील डाॅक्टर व ...
पाचल : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची रात्र-दिवस सेवा करणाऱ्या रायपाटण कोविड सेंटरमधील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद असून जिल्ह्याला आदर्शवत आहे, असे मत पाचल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे यांनी व्यक्त केले. पाचल ग्रामपंचायतीतर्फे रायपाटण कोविड सेंटरमधील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
रायपाटण कोविड सेंटरमधील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्शवत असे काम केलेले आहे. या कोविड सेंटरमधील कामाचे प्रशासनाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी कौतुकही केले होते. पाचल गावच्या सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, मुख्य लिपिक सुहास बेर्डे, माजी विद्यार्थी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजू रेडीज, कोळंब शाळेचे मुख्याध्यापक अनाजी मासये, पाचलचे व्यपारी मंगेश भोसले, सलून संघटनेचे राजू चव्हाण, रिक्षा संघटनेचे सिद्धेश नारकर, तसेच डाॅ. सारिका अडूरकर, कर्मचारी तृप्ती कांबळे, प्रियांका गुरव, शिल्पा साबळे, प्रथमेश नारकर, रोशन घाग उपस्थित होते.