जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:39+5:302021-04-21T04:31:39+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण ...

Admission to the Collector's Office closed | जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंद

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंद

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. अगदी अत्यावश्यक कामासाठी प्रवेश हवा असल्यास कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक असून, चाचणी निगेटिव्ह असल्यासच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदला जात आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयातही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील ३८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातही आता योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याधिकारी कार्यालय अभ्यागतांसाठी बंद करण्यात आले आहे. इतर कोणत्याही अत्यावश्यक कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचे असेल, तर आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तर आणि तरच अशा व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेनेही हाच निर्णय घेतला आहे.

Web Title: Admission to the Collector's Office closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.