सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:12+5:302021-04-13T04:30:12+5:30
मनसेतर्फे निर्जंतुकीकरण गुहागर : कोतळूक येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद ...
मनसेतर्फे निर्जंतुकीकरण
गुहागर : कोतळूक येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतळूक मनसे शाखा अध्यक्ष दिनेश निवाते आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्र सैनिक विलास खांबे, नितीन खांबे आदींनी स्वखर्चाने सर्व वाडीत निर्जंतुकीकरण केले.
वायरची चोरी
गुहागर : तालुक्यातील झोंबडी बौद्धवाडी येथील महावितरणच्या विद्युत प्रवाहित ट्रान्स्फॉर्मरमध्ये कॉपर वायर अज्ञात व्यक्तीने चोरल्याचा गुन्हा गुहागर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. झोंबडीतील ट्रान्स्फॉर्मर खाली उतरवून ठेवण्यात आला होता. मात्र तांब्याची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
परवानगीची मागणी
रत्नागिरी : लॉण्ड्री व्यवसाय अत्यावश्यक असल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संत गाडगेबाबा परीट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम व लॉण्ड्री असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे यांनी केले आहे.