खवले मांजराची तस्करी करणारा प्रौढ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:45+5:302021-06-16T04:42:45+5:30
रत्नागिरी : मंगळवारी तालुक्यातील हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक करणाऱ्या प्रौढाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३.४६४ किलो ग्रॅम खवले जप्त ...
रत्नागिरी : मंगळवारी तालुक्यातील हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक करणाऱ्या प्रौढाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३.४६४ किलो ग्रॅम खवले जप्त करण्यात आली.
सचिन गजानन ढेपसे (४१, रा. सुपलवाडी नाचणे, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. काही दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पोलीस खाते व वन विभाग यांनी एकमेकांच्या सहयोगाने कामगिरी करण्याचे आवाहन केले होते.
या योजनेचा भाग म्हणून मंगळवारी वन विभागातील अनेक तज्ज्ञांकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या ३२ अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई सहायक पोलीस फौजदार पांडुरंग गोरे, पोलीस हवालदार महेश गुरव, आशिष शेलार, राजेश भुजबळराव, परेश पाटोळे, उदय चांदणे यांनी केली.