Ratnagiri Crime: सून विरोधात तक्रार देईल, या भीतीने प्रौढाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:33 IST2025-04-16T15:33:23+5:302025-04-16T15:33:43+5:30
देवरुख : आपण केलेल्या सुरीच्या वारामुळे आपली सून आपल्याविरोधात पोलिसांकडे जाईल, या भीतीने एका प्रौढाने गळफास आत्महत्या केल्याचा प्रकार ...

Ratnagiri Crime: सून विरोधात तक्रार देईल, या भीतीने प्रौढाची आत्महत्या
देवरुख : आपण केलेल्या सुरीच्या वारामुळे आपली सून आपल्याविरोधात पोलिसांकडे जाईल, या भीतीने एका प्रौढाने गळफास आत्महत्या केल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथे घडला आहे. सुनील सखाराम मोहिते (वय ५९) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत सून निकिता निकेश मोहिते हिच्याशी वाद घातला होता.
असावे बौद्धवाडी येथील सुनील सखाराम मोहिते यांना मद्याचे व्यसन होते. त्याने मद्य प्राशन करून सून निकिता हिच्याबरोबर वाद घातला. भाजी कापण्याची सुरी हातात घेऊन तो सुनेच्या अंगावर धावून गेला.
या झटापटीत सुरीचे टोक निकिताच्या गळ्यावर लागून ओरखडा पडला, याची तक्रार निकेश आणि त्याची पत्नी निकिता पोलिस स्थानकात करणार होते. या भीतीने सुनील मोहिते यांनी १३ एप्रिलच्या रात्री ११:३० ते १४ एप्रिल पहाटेच्या दरम्यान घरासमोरील पडवीतील लाकडी वाशाला लोखंडी केबल अडकवून गळफास लावून घेतला.
या घटनेची माहिती निकेश सुनील मोहिते यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली. संगमेश्वरचे पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी अधिक तपास करत आहेत.