आफ्रोह आणि महिला आघाडीचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:14+5:302021-07-07T04:39:14+5:30
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून कुटुंबीयांसमवेत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा ...
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून कुटुंबीयांसमवेत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे साखळी उपोषण सुरूच राहिले.
अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवा समाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेले १८ महिने जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून आदेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या दीड वर्षापासून आफ्रोहच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सातत्याने अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्याची आवश्यकता नसताना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २५ सप्टेंबर २०२० रोजी मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यामुळे अजूनही विलास देशमुख यांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे.
१८ महिने झाले तरीही न्याय न मिळाल्याने विलास देशमुख यांनी आफ्रोह संघटनेच्यावतीने सोमवारपासून साखळी उपोषणाला प्रारंभ असून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे साखळी उपोषण सुरूच राहिले. विलास देशमुख यांच्यासह देवकीनंदन सपकाळे, आफ्रोह, महिला आघाडीच्या सदस्या प्रतिभा कोळी, आफ्रोह, महिला आघाडीच्या सदस्या आणि विलास देशमुख यांच्या पत्नी सुनंदा देशमुख, आफ्रोह महिला आघाडीच्या सचिव माधुरी मेनकार, बापुराव रोडे, पंडित सोनवणे, गजानन उमरेडकर आदींचा या उपोषणात सहभाग होता.