अखेर हर्णै बंदरातील हाेड्या मासेमारीसाठी समुद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:32 AM2021-08-15T04:32:47+5:302021-08-15T04:32:47+5:30

दापाेली : वादळ आणि पावसाळी वातावरणामुळे यावर्षी मासेमारीचा मुहूर्त लांबला हाेता. वादळी वातावरण निवळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दापाेली तालुक्यातील हर्णै ...

After all, the bones of Harnai port are in the sea for fishing | अखेर हर्णै बंदरातील हाेड्या मासेमारीसाठी समुद्रात

अखेर हर्णै बंदरातील हाेड्या मासेमारीसाठी समुद्रात

Next

दापाेली : वादळ आणि पावसाळी वातावरणामुळे यावर्षी मासेमारीचा मुहूर्त लांबला हाेता. वादळी वातावरण निवळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दापाेली तालुक्यातील हर्णै बंदरातील मच्छीमारांनी समुद्राचा अंदाज घेऊन दोन दिवसांपासून मासेमारीला सुरुवात केली आहे.

हर्णै बंदर हे मासळी खरेदी-विक्रीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे बंदर आहे. सुमारे ८०० ते ९०० नौका या बंदरात मासेमारी करतात. त्यामुळे येथे रोजच मोठा मासळी लिलाव भरतो. जून, जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी असल्यामुळे हर्णै बंदरात पूर्ण शुकशुकाट असतो; मात्र आता मासेमारीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा हर्णै बंदर गजबजला आहे. अद्याप सर्व नौका मासेमारीला गेल्या नसल्यामुळे बंदरात मासळीचे प्रमाण कमी असले तरी लवकरच सर्व नौका मासेमारीला सुरुवात करतील आणि बंदरातील अर्थकारणाला गती येईल, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. त्यातच दोन वर्षे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हताश झालेले मच्छीमार नवीन हंगामाकडे मोठ्या आशेने बघत आहेत;मात्र डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे मच्छीमारांमध्ये अस्वस्थता आहे. यावर्षी तरी मासळीचा दुष्काळ संपू दे, अशी प्रार्थना येथील मच्छीमार करत आहेत.

Web Title: After all, the bones of Harnai port are in the sea for fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.