एक महिन्याच्या झुंजीनंतर संतोष देवरूखकर यांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 02:10 PM2020-10-13T14:10:08+5:302020-10-13T14:22:49+5:30

corona virus, accident, ratnagirinews मुंबईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेने अचानक दापोली कोविड सेंटरकडे वळण घेतले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आपण संपलो, असा विचार मनात येऊन गेला. परंतु, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल एक महिन्याच्या यशस्वी झुंजीनंतर आपण कोरोनावर मात केली आहे, असे भावनिक उद्गार आहेत कोरोनावर मात केलेल्या संतोष देवरुखकर यांचे.

After a month of struggle, Santosh Devrukhkar defeated Corona | एक महिन्याच्या झुंजीनंतर संतोष देवरूखकर यांची कोरोनावर मात

एक महिन्याच्या झुंजीनंतर संतोष देवरूखकर यांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देमुंबईकडे निघालेली रुग्णवाहिकेने धरला कोविड सेंटरचा मार्ग दापोलीतील डॉक्टरांकडून उपचार

शिवाजी गोरे

दापोली : मुंबईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेने अचानक दापोली कोविड सेंटरकडे वळण घेतले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आपण संपलो, असा विचार मनात येऊन गेला. परंतु, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल एक महिन्याच्या यशस्वी झुंजीनंतर आपण कोरोनावर मात केली आहे, असे भावनिक उद्गार आहेत कोरोनावर मात केलेल्या संतोष देवरुखकर यांचे.

अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संतोष देवरुखकर यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता आपले नक्कीच काहीतरी बरेवाईट होणार, असा विचार मनामध्ये येऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना मुंबईला नेण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु, अचानक मुंबईला जाण्याचा बेत बदलला आणि रुग्णवाहिकेने थेट कोविड सेंटरचा रस्ता धरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९२ टक्के फुफ्फुस निकामी झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्याही परिस्थितीत नातेवाईकांनी आपल्याला दापोलीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.

परंतु, नीलेश शेठ यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्याचा सल्ला दिला. तसेच डॉ. महेश भागवत, डॉ. सुयोग भागवत यांच्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला. उपचाराकरिता दाखल झाल्यावर पहिले काही दिवस खूप तणावाखाली होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी उपचार सुरु केले. रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवल्यानेच आजारातून बाहेर आल्याचे देवरुखकर म्हणाले.


दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर मध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शासनाकडून इंजेक्शन, औषध, उपलब्ध करून दिले आहेत. फिजिशियन असून, सर्व सहकाऱ्यांच्या जोरावर मृत्यू दर घटविण्यात यश मिळवले आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- डॉ. महेश भागवत,
अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालयात, दापोली


दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये समाधानकारक काम होत आहे. दापोलीत सेंटर झाल्याने लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पुणे, मुंबईकडे जाणारे रुग्ण दापोलीत उपचार घेत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- नीलेश सेठ,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: After a month of struggle, Santosh Devrukhkar defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.