कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:42 PM2023-02-07T15:42:05+5:302023-02-07T15:43:10+5:30

सध्या महाराष्ट्रात जो संविधानिक पदाचा गैरवापर होत असल्याचे सांगून त्याचा निषेधही करण्यात आला.

Agitation of Agricultural University students continues, protest against change in MPSC syllabus | कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध 

कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध 

Next

दापोली : ‘परत द्या, परत द्या, आमचा हक्क परत द्या’ अशा घोषणा देत दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून साेडला. एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दापाेली काेकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन सुरू केले आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियंते विद्यार्थ्यांचे २५ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू आहे. अद्याप त्यांच्या आंदाेलनाची दखल शासनाने आणि आयोगाने घेतलेली नाही. त्यामुळे हे आंदाेलन सुरूच आहे. सध्या महाराष्ट्रात जो संविधानिक पदाचा गैरवापर होत असल्याचे सांगून त्याचा निषेधही करण्यात आला.

कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत आहे. हे अन्यायकारक धोरण तत्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तत्काळ स्थगिती द्यावी. राज्यांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदाेलन सुरू केले आहे.

Web Title: Agitation of Agricultural University students continues, protest against change in MPSC syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.