दापोलीत संयुक्त कृषी संशोधन बैठकीचे आज कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, ३०० ते ३५० शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:00 PM2022-12-14T13:00:20+5:302022-12-14T13:00:49+5:30
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनावर या संयुक्त कृषी परिषदेमध्ये चर्चा होणार
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ५०वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संयुक्त कृषी संशोधन बैठकीचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.
दापोली येथे दि. १४ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतील सर्व कुलगुरू, संचालक, विभागप्रमुख, सर्व पीक समन्वयक आणि कृषी व संलग्न विभागातील सचिव, आयुक्त आणि अधिकारी; त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सर्व संचालक असे एकूण मिळून एकूण ३०० ते ३५० शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनावर या संयुक्त कृषी परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. त्या त्या विद्यापीठाच्या आधुनिक तंत्रज्ञान अवजारे, वाण या सर्व बाबींचा विचार होऊन मंजुरी दिली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संयुक्त कृषी परिषदेच्या बैठकीसाठी चारीही विद्यापीठांतील कुलगुरू, शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे.