कृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:08 PM2019-02-16T13:08:47+5:302019-02-16T13:14:34+5:30
कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु नसल्याने प्रशासकीय कामात काही अडथळे निर्माण होऊन, गतिमान प्रशासनाला थोडा ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. परंतु, कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी समन्वयक या नात्याने प्रयत्न केले जाईल.
कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.
कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेवर निरंजन डावखरे यांची निवड झाली आहे. कृषी विद्यापीठाचे समन्वयक म्हणून त्यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यावर लवकरच उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्याने त्यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन करीत आहेत आपण आजपर्यंत आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात एवढेच संशोधन विद्यापीठाचे असल्याचे बोलले जात होते. मात्र विद्यापीठाने याही पुढे जाऊन कोकणच्या लाल मातीत उत्कृष्ट स्टॉबेरी भाजीपाला विविध फळ पिकाचे संशोधन केले आहे. विद्यापीठाचे हे संशोधन कौतुकास्पद आहे. विद्यापीठाचे कामाला सरकारची जोड मिळावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण कृषि विद्यापीठाला सरकारची सर्वतोपरी मद्त मिळावी कोकणातील शेतकºयांचा व कृषि क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, संशोधन, विस्तार या विविध उपक्रमाचा आढावा घेतला असता, काही बाबींना सरकारकडून आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
कोकण कृषि विद्यापीठाचे संशोधन आता केवळ कोकणापुरते मर्यादित राहु नये, त्याची व्याप्ती देश पातळीवर असायला हवी. कोकणातील भात, मासे, नारळ, सुपारी, आंबा, काजू या पुढे जावून संशोधन होने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील कृषि विद्यापीठे शिक्षण, संशोधन, विस्तार, या विविध स्तरावर काम सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी कृषि विद्यपिठाचे संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे.