मदतनिसांच्या मानधनाचा खोळंबा

By admin | Published: August 31, 2014 11:04 PM2014-08-31T23:04:48+5:302014-08-31T23:41:36+5:30

अपेक्षांवर पाणी : गणेशोत्सवात चणचण असल्याने नाराजी

Aid for the helpers of the helpers | मदतनिसांच्या मानधनाचा खोळंबा

मदतनिसांच्या मानधनाचा खोळंबा

Next

गुहागर : गुहागर तालुक्यातील एकात्मिक बालविकास खात्यांतर्गत २२९ अंगणवाड्यांचे काम पाहणाऱ्या अंगणवाडी व मदतनिसांचे मानधन गेल्या दोन महिन्यांपासून न मिळाल्याने नाराजी आहे. गणेशोत्सवापूर्वी हे मानधन मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र, ते न मिळाल्याने या महिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. तत्पूर्वी मानधन मिळणे गरजेचे होते. अंगणवाडी सेविकांसाठी ५ हजार रुपये, तर मदतनिसांसाठी ३ हजार रुपये मानधन दिले जाते. दर दोन ते तीन महिने एवढ्या उशिरा मानधन काढले जाते. गणेशोत्सवापूर्वी राहिलेले मानधन काढले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, अद्याप मानधन मिळालेले नाही. याबाबत एकात्मिक बालविकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या मानधनाची अर्धी रक्कम खात्याकडे नुकतीच वर्ग करण्यात आली असून, लवकरच अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या सेविकांचे मानधन आधीच कमी असताना जुलै महिन्याचे पूर्ण मानधन न देता काही रक्कमच दिली जाणार असल्याने शासन या सेविकांची चेष्टा करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अंगणवाड्यातून दिला जाणारा पोषण आहार व इतर कार्यालयीन कामकाजासाठी संगणक आवश्यक असताना कार्यालयातील दोन संगणक दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. उपलब्ध संगणकही काम करण्यास योग्य नसल्याने कामाची गैरसोय होऊन संबंधित सर्वांचेच नुकसान होत असल्याने या कार्यालयाला नवीन संगणक संच द्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aid for the helpers of the helpers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.