पोर्ट्रेटमध्ये अक्षय परांजपे, माॅडेलिंगमध्ये ओम पाडळकर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:05+5:302021-07-21T04:22:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लव्हर्स आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लव्हर्स आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी जीजेसी ९५ फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने संजीव साळवी स्मृती खुल्या फोटोग्राफी स्पर्धेसाठी २२८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विक्रम केला आहे. मॉडेलिंग आणि पोट्रेट अशा दोन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मॉडेलिंग फोटोग्राफी स्पर्धेत ओम पाडळकर, तर पोट्रेट फोटोग्राफी स्पर्धेत अक्षय परांजपे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
बिपीन बंदरकर, डॉ. आनंद आंबेकर तसेच कुणाल संजीव साळवी यांनी ९५ फॅमिली आणि युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक फोटोग्राफी करणाऱ्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. मिलिंद केतकर व समाधान पारकर या मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी ऑनलाईन परीक्षण केले.
पोर्ट्रेट फोटोग्राफी स्पर्धेत द्वितीय क्रमांक आदित्य पुराणिक (पाली, रायगड), तृतीय क्रमांक मनीष रूद्रे (सांताक्रुज, मुंबई) तर मॉडेलिंग फोटोग्राफी स्पर्धेत द्वितीय क्रमांक- अमर शेठ (रत्नागिरी), तृतीय क्रमांक- अमेय गोखले (रत्नागिरी) यांनी मिळविला. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
स्पर्धेेतील प्रथम क्रमांकासाठी पराग पानवलकर यांनी बक्षिसाची रक्कम दिली. तसेच बिपीन बंदरकर, डॉ. आनंद आंबेकर, परेश राजीवले, नितीन मिरकर, बिपीन शिवलकर, शेखर कवितके, विजय मलुष्टे, संदेश गांगण, दीपक पवार यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी ऑनलाईन समन्वयक म्हणून युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनचे प्रा. शुभम पांचाळ आणि डॉ. आनंद आंबेकर यांनी परिश्रम घेतले.