आरजीपीपीएल कंपनीने घेतले क्षारयुक्त पाण्याचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:53+5:302021-04-05T04:27:53+5:30

असगोली : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाकडे त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर ...

Alkaline water samples taken by RGPPL company | आरजीपीपीएल कंपनीने घेतले क्षारयुक्त पाण्याचे नमुने

आरजीपीपीएल कंपनीने घेतले क्षारयुक्त पाण्याचे नमुने

Next

असगोली : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाकडे त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्यानंतर कंपनीमधील यु. पी. एल. कर्मचाऱ्यांनी येथील दोन झरे आणि एका विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच आरजीपीपीएल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन माहिती घेतली.

यावेळी ग्रामस्थांनी डिसेंबर १९९९मध्ये झालेल्या द्रवरूप नाफ्ता प्रदूषणाची दाहक पार्श्वभूमीही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. या भागातील झरे व विहिरीच्या पाणी नमुने तपासणीचा लेखी अहवाल आम्हाला प्राप्त व्हावा, अशी मागणी केली आहे.

तसेच प्रदूषित भागाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी लावून धरली आहे.

याभागात राहणारे ग्रामस्थ यांच्या आंबा, काजू, नारळ, सुपारी, केळी अन्य बागायती पिकांसाठी येथील झरे आणि विहिरी यातील पाण्याचा वापर गेली अनेक वर्षे केला जात आहे. या पिकांवरच ग्रामस्थांचे उत्पन्न अवलंबून आहे. क्षारयुक्त प्रदूषित पाण्याची समस्या यापुढे दूर झाली नाही तर येथील ग्रामस्थांचे बागायती क्षेत्र आणि पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

चाैकटक

ग्रामपंचायतीच्या विहिरीला धाेका

क्षारयुक्त पाण्याचे प्रवाह नेमक्या कोणत्या भागातून प्रवाहित झाले आणि त्यानंतर ब्राह्मणवाडी येथील झरे आणि विहिरी प्रदूषित झाल्या, याबाबत अद्याप कंपनी प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

अंजनवेल गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी ग्रामपंचायत अंजनवेल यांच्या मालकीची मुख्य विहीरही ब्राह्मणवाडीमध्ये नदीजवळ आहे. क्षारयुक्त प्रदूषित पाणी जर या विहिरीमध्ये मिसळले तर ऐन उन्हाळ्यात संपूर्ण अंजनवेल गावाचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Web Title: Alkaline water samples taken by RGPPL company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.