तरुणांपासून वृध्दांपर्यंत सारे सारखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:12+5:302021-07-09T04:21:12+5:30
सध्या प्रत्येक व्यक्तीचेच एकापेक्षा अधिक मोबाईल क्रमांक आहेत. त्यामुळे यापैकी तिशीतील व्यक्तींना आपले दोन्ही क्रमांक आणि पत्नीचा पहिला नंबर ...
सध्या प्रत्येक व्यक्तीचेच एकापेक्षा अधिक मोबाईल क्रमांक आहेत. त्यामुळे यापैकी तिशीतील व्यक्तींना आपले दोन्ही क्रमांक आणि पत्नीचा पहिला नंबर सांगता आला. मात्र, दुसरा सांगण्यासाठी मोबाईल बघावा लागला.
४५ शी ओलांडलेल्या व्यक्तींना आपला एक नंबर सांगता आला. मात्र, दुसरा नंबरही आठवून सांगावा लागला. पत्नीचाही एक नंबर तोंडपाठ होता. मात्र, दुसरा असेल तर तो लक्षात राहात नाही.
६० वर्षांवरील ठराविक लोकांनाच पत्नीचा नंबर आठवतो. या वयोगटातील व्यक्तींना सर्रास मोबाईलवर पाहून सांगावा लागला.
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आवरेना
डोक्यात अनेक विचार असतात. त्यामुळे कुठलेच नंबर लक्षात राहात नाहीत. मोबाईलमध्ये सगळे नंबर नावाने सेव्ह असल्याने आठवावे लागत नाहीत. कॉल करताना नंबरच थेट डायल केला जातो. त्यामुळे तो लक्षात नाही.
एक नोकरदार महिला, रत्नागिरी
पतीचा नंबर नावाने सेव केलेला आहे. कुणाला सांगायचे झाल्यास मोबाईलवर बघून सांगत असल्याने मुद्दामहून लक्षात ठेवावा लागला नाही. एक नंबर सांगता येतो. पण त्यानंतर आता दुसरा नवीन घेतलेला नंबर लक्षात नाही.
- एक गृहिणी, रत्नागिरी
लेकरांना मात्र आई-बाबांचा नंबर तोंडपाठ
आई - बाबा सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी त्यांना फोन करत असते. तसेच कुणी त्यांचे नंबर विचारले तर मी ते माझ्या वहीत लिहून ठेवल्याने सांगतानाच माझेही हे नंबर तोंडपाठ झाले आहेत. आई - बाबांबरोबरच घरातील काका, दादा यांचेही नंबर माझ्या लक्षात आहेत. त्यामुळे ते मला चटकन सांगता येतात.
- शिवानी सावंत, शालेय विद्यार्थिनी
माझ्या शाळेच्या नोटबुकमध्ये मी माझ्या आई - वडिलांचा मोबाईल नंबर लिहून घेतला होता. त्यानंतर माझ्या शाळेतील सर किंवा मॅडम यांनी विचारल्यानंतर मी तो एक-दोनदा बघून सांगितला. पण त्यानंतर तो आता माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे. त्यामुळे कुणी विचारलं की दोघांचेही नंबर मला पटकन आठवतात.
- ऋग्वेद जेधे, शालेय विद्यार्थी