चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमेत सर्व यंत्रणा ‘पास’

By शोभना कांबळे | Published: November 9, 2023 05:23 PM2023-11-09T17:23:33+5:302023-11-09T17:24:34+5:30

समुद्रातील व्यक्तींना लाईफ बोट, जॅकेट, दोरीच्या सहाय्याने किनाऱ्यावर आणले 

All systems ready in Cyclone disaster relief colorful training in Ratnagiri | चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमेत सर्व यंत्रणा ‘पास’

चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमेत सर्व यंत्रणा ‘पास’

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोली मधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या ५ गावांमध्ये व जेएसडबल्यु जयगड, आरजीपीपीएल, कोकण एलएनजी, गुहागर या २ कंपन्यामध्ये, तसेच आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स, अल्ट्राटेक या बंदरावर गुरूवारी चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. यात सर्व विभागांची सज्जता दिसून आली.

चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावर दोन वेळा बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. रंगीत तालीमच्या अनुषंगाने ७ तारखेला नियोजन करण्यात आले होते.

गुरूवारी सकाळी साडेआठवाजल्यापासून विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते. यात महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांचा समावेश होता. गावांमधून इशारा देवून सतर्क करणे,आवश्यक साधनसामुग्रीच्या सहाय्याने जखमींना वाचविणे, जखमीना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, रुग्णवाहिकेच्यामाध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे, समुद्रात असणाऱ्या व्यक्तींना लाईफ बोट, लाईफ जॅकेट,दोरी आदीच्या सहाय्याने वाचवून किनाऱ्यावर आणणे आदी प्रात्याक्षिके विविध विभागांनी या रंगीत तालीमेत सादर केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, मुक्ता भोसले पोलीस उपनिरीक्षक, वेदभूषण करंगुटकर व विक्रांत तेंडुलकर (उपअभियंता बंदर विभाग), सीमा डोंगरे (माहिती तंत्रज्ञ), प्रसाद माईन व रमेश तडवी (महसूल सहायक) आदींनी जिल्हास्तरावरुन या रंगीत तालीमेचे नियंत्रण केले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Web Title: All systems ready in Cyclone disaster relief colorful training in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.