प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत निवडलेले सगळे लाभार्थी रत्नागिरीतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:18 IST2025-03-11T17:17:19+5:302025-03-11T17:18:49+5:30
रत्नागिरी : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १२ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मत्स्यव्यवसाय खात्याच्या प्रधान कार्यालयातील मंजूर लाभार्थ्यांची ...

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत निवडलेले सगळे लाभार्थी रत्नागिरीतील
रत्नागिरी : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १२ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मत्स्यव्यवसाय खात्याच्या प्रधान कार्यालयातील मंजूर लाभार्थ्यांची यादी रत्नागिरी कार्यालयाला पोहोच झाली आहे.
सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांनी सांगितले की, सिद्धेश अविनाश मोहिते, झिशान हनिफ हजलानी यांना इन्सुलेटेड व्हेईकलची योजना मंजूर झाली आहे. कावेरी किशोर नार्वेकर, स्पृहा पुष्कर भुते, प्रीती ओमकार मोरे, सना अझिम चिकटे, शर्वरी सिद्धिविनायक खडपकर, सोमय्या साहिल मुकादम, अर्चना महेंद्र घाग, प्रीती संदेश सुर्वे, तन्वी राकेश चवंडे, संजना गोकुळ बोरकर या सर्वांना खोल समुद्रातील मच्छीमारीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची योजना मंजूर झाली आहे.
लाभार्थी फक्त रत्नागिरीतील
विशेष बाब म्हणजे निवडलेले सगळे लाभार्थी फक्त रत्नागिरी तालुक्यातील आहेत. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबई कार्यालयात सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली.