रत्नागिरीतील पाचही आमदार एकनाथ शिंदे यांचे असतील- उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Published: March 19, 2023 08:33 PM2023-03-19T20:33:41+5:302023-03-19T20:35:09+5:30
नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावले टोले
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, खेड: आज रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन आमदार आहेत. पण पुढच्या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही आमदार.एकनाथ शिंदे यांचेच असतील, असा दावा उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.
आपले मुख्यमंत्री @mieknathshinde हे आपले कुटुंबप्रमुख आहेत. ही खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. खेड मध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, या भागातील दोन नाही तर पाच ही आमदार शिवसेनेचे असतील असं जाहीर आश्वासन देतो.
— Uday Samant (@samant_uday) March 19, 2023
येथील गोळीबार मैदानावरील मुख्यमंत्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. मंत्री सामंत यांनी यावेळी नाव न घेता उध्दव ठाकरे यांना अनेक टोले हाणले. ५ मार्चला याच मैदानावर झालेली सभा काॕर्नर सभा वाटावी, इतकी गर्दी आज झाल्याचे सामंत म्हणाले. गुवाहाटीचा घाव इतका वर्मी लागला आहे की अजूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत.
या सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी, आमदार भरत गोगावले, मंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम यांचीही भाषणे झाली.