निर्बंध पाळून रिक्षा व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:21+5:302021-04-12T04:29:21+5:30
खेड : कोरोनाच्या संकटापासून रिक्षा व्यावसायिक आर्थिक कोंडीत अडकला आहे. मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे रिक्षा व्यवसाय बंद ठेवावा लागल्यास कुटुंबावर ...
खेड : कोरोनाच्या संकटापासून रिक्षा व्यावसायिक आर्थिक कोंडीत अडकला आहे. मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे रिक्षा व्यवसाय बंद ठेवावा लागल्यास कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंधांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी यांनी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना दिले आहे.
परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना संचार बंदीतून वगळून रिक्षा व्यवसाय दोन प्रवासी संख्येसह दिवसा व रात्री सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. यामुळे कोरोनाच्या लढाईत सेवा देणारे आरोग्य विभागातील कर्मचारी, कामगार जिल्ह्याबाहेरून एसटी व रेल्वेने प्रवास करणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना सेवा देता येईल. रिक्षा व्यावसायिकांनी काढलेले व्यवसाय कर्ज बंदच्या कालावधीत थकण्याची शक्यता असल्याने व्याज माफ करून हप्ते भरण्यासाठी वित्तीय संस्थांना मुदत देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे, तसेच प्रत्येक परवानाधारक व्यावसायिकाला आगामी ५ वर्षांसाठी परवाना शुल्क माफ करावे, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.