चिपळुणात लसीचे कूपन घेण्यासाठी अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:32+5:302021-07-07T04:38:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाची लस घेण्यासाठी येथील नगर परिषद लसीकरण केंद्रावर सोमवारी कूपन वाटप करीत असताना मोठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाची लस घेण्यासाठी येथील नगर परिषद लसीकरण केंद्रावर सोमवारी कूपन वाटप करीत असताना मोठी गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
जिल्ह्यात लसीकरणावर भर देऊन कोरोनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. चिपळूणमध्ये लस घेण्यासाठी आदल्या दिवशी कूपन वाटण्यात येतात; परंतु हे कूपन देण्याच्या ठिकाणी योग्य नियोजन नसल्यामुळे मात्र नागरिकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घरोघरी किंवा याआधी वाॅर्डप्रमाणे लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी नगर परिषद आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन लसीचे प्रमाण वाढविण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ आता विविध राजकीय पक्षांकडून लस वाढविण्यासाठी निवेदने दिली जात आहेत. अशातच लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.