माजी विद्यार्थ्यांची बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:58+5:302021-07-05T04:19:58+5:30

आर्थिक मदतीसाठी आवाहन रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राम्हण संघातर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कऱ्हाडे ब्राम्हण ज्ञातीतील हुशार, होतकरू आठवीपासून ...

Alumni Commitment | माजी विद्यार्थ्यांची बांधिलकी

माजी विद्यार्थ्यांची बांधिलकी

googlenewsNext

आर्थिक मदतीसाठी आवाहन

रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राम्हण संघातर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कऱ्हाडे ब्राम्हण ज्ञातीतील हुशार, होतकरू आठवीपासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी, पालकांनी कऱ्हाडे ब्राम्हण संघाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवारपासून लसीकरण

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात बुधवार, दि. ७ जूनपासून लसीकरण केले जाणार आहे. १८ ते २९ वयोगटातील तरूणांसाठी लसीकरण मोहीम राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. शहर व तालुक्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

क्रीडा समितीची सभा

दापोली : दापोली तालुका क्रीडा समितीची सभा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. आमदार योगेश कदम यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, तालुका क्रीडा अधिकारी रूही शिंगाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर उपस्थित होते.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मंडणगड : तालुक्यातील कुडुक खुर्द दत्तरामवाडी येथे महाडचे आमदार भरत गोगावले, शिवसेना युवा नेते विकास गोगावले, युवा उद्योजक सुशांत जांबरे यांच्यातर्फे तसेच भेलोशी ग्रामस्थ मंडळ, मुंबई व श्रीराम सेवक मंडळ यांच्या प्रयत्नातून वाडीतील गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सावर्डेत वृक्षारोपण

चिपळूण : माजी पंचायत समिती सभापती पूजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गावातील विविध ठिकाणी मोकळ्या असलेल्या जागेत झाडे लावण्यात येत आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांना जांभूळ, आंबा, काजू कलमांचे वाटप करण्यात आले.

ऑनलाईन काव्य संमेलन

मंडणगड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी विभाग, मंडणगड तालुका शाखा, विद्यार्थी मदत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन राजर्षी शाहू महाराज काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ३५ काव्यरचना सादर करण्यात आल्या.

सुपरफास्ट स्पेशल

खेड : अमृतसर - कोच्युवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. ११ जुलैपासून कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा धावणार आहे. ही पूर्णपणे आरक्षित गाडी दर रविवारी पहाटे ५.५५ वाजता अमृतसर येथून सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता कोच्युवेलीला पोहोचणार आहे.

दरडग्रस्त भागाची पाहणी

खेड : तालुक्यातील नातूनगर-हुंबरवाडी येथे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. यामुळे भूगर्भतज्ञ संदीप माने यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली. याबाबत अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. दरडी कोसळून ग्रामस्थांना त्रास होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

स्टाॅलधारकांना नोटीस

राजापूर : लाॅकडाऊनमुळे आगारातील व्यावसायिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. असे असताना एस. टी महामंडळाने मे व जून महिन्यातील परवाना शुल्क व्याजासह भरण्याची नोटीस बजावली आहे. व्यवसायावर परिणाम झालेला असताना एवढी रक्कम कुठून उभी करावी, असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

Web Title: Alumni Commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.