गोदूताई जांभेकर महाविद्यालयात आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:47+5:302021-04-17T04:31:47+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित गोदुताई जांभेकर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक ...
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित गोदुताई जांभेकर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश भीमराव चव्हाण, प्रमुख वक्ते, वरिष्ठ शिक्षक राजेश कांबळे यांच्या हस्ते डॉ. आबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक आर. बी. चव्हाण यांनी मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. विद्यार्थी कोरोना काळातही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवित आहेत. रत्नागिरी पर्यावरण संस्थेमार्फेत घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेत विद्यार्थी चमकले असून, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अनिल सागवेकर, चंद्रकांत पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला. राजेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शुभांगी अभ्यंकर, तर आभारप्रदर्शन अस्मिता फाटक यांनी केले.