तब्बल आठ वर्षांनंतर बदलले रुग्णवाहिकांचे भाडेदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:51+5:302021-06-09T04:39:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क टेंभ्ये : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेचे भाडेदर नव्याने निश्चित केले आहेत. सन २०१३ नंतर ...

Ambulance fares change after eight years | तब्बल आठ वर्षांनंतर बदलले रुग्णवाहिकांचे भाडेदर

तब्बल आठ वर्षांनंतर बदलले रुग्णवाहिकांचे भाडेदर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

टेंभ्ये : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेचे भाडेदर नव्याने निश्चित केले आहेत. सन २०१३ नंतर प्रथमच ही भाडे दरवाढ करण्यात आली आहे. २५ किलाेमीटर अथवा २ तासांकरिता तसेच प्रति किलाेमीटर भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सध्याच्या प्रचलित भाडे दरापेक्षा जवळपास दुप्पट वाढ नवीन भाडेदरामध्ये करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर नवीन भाडे दरवाढीमध्ये रुग्णवाहिकेची स्वच्छता तथा निर्जंतुकीकरण व वाहनचालकाच्या पीपीई किट्‌ससाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

इंधनाचे वाढलेले दर लक्षात घेऊन ही भाडेदरवाढ केली असल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांनी सांगितले़ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे यांनी या संदर्भातील पत्रकाला प्रसिद्धी दिली आहे़ प्राधिकरणाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे दर आकारल्यास अशा वाहनचालक मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारणी करणाऱ्या वाहनचालकांवर पहिला गुन्हा ५००० रुपये दंड, दुसरा गुन्हा १०,००० रुपये दंड व तिसऱ्या गुन्ह्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सदस्य तथा जिल्हा पोलीसप्रमुख व सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत नवीन भाडेदरवाढीला ७ जून २०२१ रोजी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली आहे.

गाडी नवीन दर जुना दर (रुपयांमध्ये)

मारुती व्हॅन - ७००/- ३०० /-

टाटा सुमो,मेटॅडोर - ८४० /- ३५० /-

टाटा ४०७/ स्वराज माझदा - ९८० /- ४५० /-,

आयसीयू अथवा वातानुकूलित वाहने - ११९० /- ६०० /-

प्रति किलाेमीटर भाडेदर

मारुती व्हॅन - १४ /- ८ /-

टाटा सुमो, मेटॅडोर - १४ /- १० /-

टाटा ४०७/ स्वराज माझदा - २० /- १२ /-,

आयसीयू अथवा वातानुकूलित वाहने - २४ /- १६ /-

स्वच्छता तथा निर्जंतुकीकरण

मारुती व्हॅन - ५०० रुपये.

टाटा सुमो,मेटॅडोर - ७०० रुपये

टाटा ४०७/ स्वराज माझदा व आयसीयू अथवा वातानुकूलित वाहने - १००० रुपये

वाहन चालक पीपीई किट्‌ससाठी प्रत्येक सर्व प्रकारच्या वाहनांना ५०० रुपये

Web Title: Ambulance fares change after eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.