सिलिंडरच्या गळतीने लागलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात संगमेश्वर तालुक्यात घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:14 IST2024-09-09T13:11:03+5:302024-09-09T13:14:54+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलिंडर गळतीने लागलेल्या आगीत भाजलेल्या एका प्रौढाचा शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ...

सिलिंडरच्या गळतीने लागलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात संगमेश्वर तालुक्यात घडली दुर्दैवी घटना
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलिंडर गळतीने लागलेल्या आगीत भाजलेल्या एका प्रौढाचा शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळू सोमा बांबाडे (५५, रा. गोमानेवाडी, संगमेश्वर) असे प्रौढाचे नाव आहे. या घटनेमुळे ऐन गणेशोत्सवात बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेंबवणे गोमानेवाडी येथील बाळू बांबाडे हे शनिवारी सकाळी ८:३० वाजता घरात गणेशमूर्तीची पूजा करत होते. त्यांची पत्नी सारवण करत हाेती. त्यांनी बांबाडे यांना हाक मारून गॅस बाजूला करण्यास सांगितले. यावेळी गॅस लिकेज झाला आणि सिलिंडरचा भडका उडाला. या दुर्घटनेत बांबाडे हे ९० टक्के भाजले.
ग्रामस्थांनी त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तिथे उपचार सुरू असतानाच सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.