देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ रत्नागिरीतील करबुडेत, आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 02:01 PM2022-05-16T14:01:20+5:302022-05-16T14:05:50+5:30

हा क्रांतिकारी स्तंभ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव अशोक मुद्रांकीत स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे. तब्बल ६५ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी बौद्ध दीक्षा भूमी क्रांती स्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले.

Anandraj Ambedkar will inaugurate the only sealed Revolutionary Pillar in the country at Karbud in Ratnagiri tomorrow | देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ रत्नागिरीतील करबुडेत, आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार

देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ रत्नागिरीतील करबुडेत, आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार

Next

रत्नागिरी : देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे उभारण्यात आला आहे. या दीक्षा भूमी क्रांती धम्म स्तंभाचे उद्या, मंगळवारी, (दि. १७) सकाळी ९ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बौद्ध दीक्षा भूमी विकास समितीचे अध्यक्ष अमोल जाधव व मुंबई अध्यक्ष अनिल जाधव यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षापूर्वी करबुडे येथे रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. रत्नागिरी तालुक्यातील निवळी, भोके, फणसावळे, आडोब, केळ्ये, वेतोशी, जांभरूण, खरवते, करबुडे या गावातील लोकांना दिनांक १६ मे १९५७ साली भैयासाहेब आंबेडकर आणि भदंत आनंद कौशल्यानंद यांच्या अधिपत्याखाली बौद्ध धम्माची दीक्षा याच स्तंभाच्या ठिकाणी देण्यात आली. त्यानंतर बौध्द दीक्षा भूमी विकास समिती या संघटनेच्या तब्बल ६५ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी बौद्ध दीक्षा भूमी क्रांती स्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले. हा क्रांतिकारी स्तंभ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव अशोक मुद्रांकीत स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे.

या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येने लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन दीक्षा भूमी विकास समितीचे स्थानिक सचिव महेश सावंत यांनी केले आहे.

Web Title: Anandraj Ambedkar will inaugurate the only sealed Revolutionary Pillar in the country at Karbud in Ratnagiri tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.