आंगवली - रेवाळेवाडीत विहीर काेसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:12+5:302021-09-06T04:36:12+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली - रेवाळेवाडी येथे जवाहर ग्राम समृद्धी याेजनेतून बांधण्यात आलेली विहीर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली - रेवाळेवाडी येथे जवाहर ग्राम समृद्धी याेजनेतून बांधण्यात आलेली विहीर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे काेसळली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, दाेन दिवस सुटी आल्याने या घटनेचा पंचनामा हाेऊ शकलेला नाही.
तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडीतील प्रताप गोविंद रेवाळे यांच्या घरानजीक सन २००६-०७ मध्ये ही विहीर बांधण्यात आली हाेती. या विहिरीचे पाणी परिसरातील पाच ते सहा कुटुंबे पिण्यासाठी वापरतात. या विहिरीची उंची अंदाजे २५ फूट इतकी आहे. शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही विहीर पूर्णतः कोसळली गेली आहे. काळ्या दगडाचे बांधकाम असलेली ही विहीर ढासळल्याने बुजली आहे. यामुळे आता येथील कुटुंबांच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. विहीर काेसळल्याने सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुटीमुळे दाेन दिवस पंचनामा हाेऊ शकलेला नाही.
040921\58191854-img-20210904-wa0040.jpg
आंगवली रेवाळवाडी येथील ढासळलेली विहीर