संगमेश्वरात मेलेल्या कोंबड्या रस्त्यावर फेकल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:58+5:302021-04-30T04:40:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यात वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा संतर्क झाली आहे. वाडीवस्तीमधून ग्रामपंचायत पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र संगमेश्वर शहराच्या जवळील मारुती मंदिर येथे संगमेश्वर देवरूख मार्गावर मेलेल्या कोंबड्या रस्त्यावर फेकल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर बाजारपेठ सलग सात दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी कमी झालेली आहे. मात्र फेरीवाले वाडीवस्तीतून जात आहेत. गाड्या घेऊन जात असताना अनेक वेळ घाण रस्त्यावर फेकून दिली जात आहे. संगमेश्वर शहराच्या जवळील मारुती मंदिर येथे रात्रीच्या दरम्यान मेलेल्या कोंबड्या रस्त्यावर फेकून गाडीचालकाने पलायन केले. चार ते पाच कोंबड्या मेलेल्या रस्त्यावर फेकून दिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक ग्रमस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तसेच मेलेल्या कोंबड्या रस्त्यातच फेकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.