निधीचा सुनियाेजन करण्यात अंजनवेल ग्रामपंचायत अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:26+5:302021-04-04T04:32:26+5:30
फोटो नं. ०३यशवंत बाईत.जेपीजी ०३आरटीएन०१.जेपीजी फोटो कॅप्शन अंजनवेल ग्रामपंचायत इमारत. लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : अंजनवेल ग्रामपंचायतीला शासनाच्या व ...
फोटो नं.
०३यशवंत बाईत.जेपीजी
०३आरटीएन०१.जेपीजी
फोटो कॅप्शन
अंजनवेल ग्रामपंचायत इमारत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : अंजनवेल ग्रामपंचायतीला शासनाच्या व अन्य मार्गाने उपलब्ध होणाऱ्या निधीचा सुनियोजित वापर करून सर्व घटकापर्यंत घराघरांतून शासनाच्या विकास योजना सक्षमपणे राबविल्याने ग्रामपंचायतीला शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पथकाने या पुरस्कारासाठी तपासणी केली होती. जिल्ह्यातून अंजनवेल निर्मल ग्रुप ग्रामपंचायत व पाटपन्हाळे ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायती स्पर्धेत राज्यपातळीवर दाखल झाल्या होत्या. या दोन ग्रामपंचायतींपैकी अंजनवेल ग्रामपंचायतीची सर्वसाधारणमधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत स्वच्छतेबरोबरच वंचित घटकांचा विकास अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांगांच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न लोकसहभाग, ग्रामसभा मासिक सभा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अभिलेख सेवा पुरविणे कामकाजामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग विकास आराखड्याप्रमाणे अंमलबजावणी उत्पन्नवाढीसाठी केलेले प्रयत्न सामाजिक दायित्व म्हणून कार्यवाही, ग्रामपंचायत पातळीवर तक्रार निवारणाची कामगिरी, आदी क्षेत्रात चांगले काम केल्याने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रोख रक्कम सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायतीला गौरविण्यात येणार आहे.
कोट -
सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळेच आम्हाला पुरस्कार प्राप्त झाला असून, ही बाब आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. गेली दहा वर्षे अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली. या महिन्याच्या २१ तारखेला आमचा कार्यकाळ संपत असून, यापूर्वीच हा पुरस्कार मिळाल्याने खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे.
- यशवंत बाईत, सरपंच