दापोली नगरपंचायत देशात दुसरी, राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:22 PM2022-01-07T23:22:18+5:302022-01-07T23:23:29+5:30
दापोली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष उल्का ताई जाधव परवीन ताई शेख यांच्या कारकिर्दीत दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते
दापोली (शिवाजी गोरे )
रत्नागिरी - राष्ट्रीय जल पुरस्कार-2020ची आज घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. तर, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील 'सुर्डी ग्रामपंचायत' पश्चिम विभागात तिसरी आली आहे.
दापोली नगरपंचायतीने लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात केली होती दापोली नगरपंचायतचे तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या संकल्पनेतून श्रमदान व लोकसहभागातून नारगोली धरणातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यामुळे दापोली शहर टँकर मुक्त शहर बनवून दापोली नगरपंचायतीने पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात केली होती. दापोलीतील जनतेने लोकसहभागातून राबवलेल्या या मोहिमेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्याचे फलित म्हणून दापोली नगरपंचायतीला 2020 चा राष्ट्रीय पातळीवरचा जल पुरस्कार जाहीर झाला आहे.
दापोली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष उल्का ताई जाधव परवीन ताई शेख यांच्या कारकिर्दीत दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. त्यामुळे या शहराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकली. दापोली नगरपंचायतीने राबवलेल्या या मोहिमेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याने दापोली नगरपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.