Ratnagiri news: कर्णेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सोनेरी किरणांचा अभिषेक!, नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी
By मनोज मुळ्ये | Published: March 15, 2023 03:41 PM2023-03-15T15:41:16+5:302023-03-15T15:41:52+5:30
सुमारे १० ते १२ मिनिटे भक्तगणांना आज हा सोहळा अनुभवता आला.
सचिन मोहिते
देवरुख : बुधवारची सकाळ संगमेश्वर तालुकावासियांसाठी खास ठरली. सकाळी ६.४७ वाजता सूर्योदय झाला अन् बरोबर ७ वाजता संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीला सूर्य किरणांनी शंभू महादेवांना सोनेरी स्नान घातले.
वातावरणात पसरलेला भक्तिभाव आणि मंदिराच्या गाभाऱ्यात सर्वत्र पसरलेला सोनेरी प्रकाश असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती .
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सूर्य मावळतीला गेल्यानंतर किरणोत्सव होतो. कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने येथे सूर्योदयालाच किरणोत्सवाचा अद्भुत सोहळा पहायला मिळतो. खगोल शास्त्र, स्थापत्य शास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच सोहळा असल्याचे मत यावेळी भाविकांनी व्यक्त केले. सुमारे १० ते १२ मिनिटे भक्तगणांना आज हा सोहळा अनुभवता आला.