महिला काेविड रुग्णालयात आणखी २०० खाटा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:01+5:302021-05-31T04:23:01+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाच्या टप्पा २ च्या २०० खाटांच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उद्घाटन ...

Another 200 beds available at Mahila Kavid Hospital | महिला काेविड रुग्णालयात आणखी २०० खाटा उपलब्ध

महिला काेविड रुग्णालयात आणखी २०० खाटा उपलब्ध

Next

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाच्या टप्पा २ च्या २०० खाटांच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उद्घाटन करून लोकार्पण केले. या रुग्णालयात २०० खाटा ऑक्सिजन सुविधेसह उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काेराेना रुग्णांना आणखी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी महिला रुग्णालयातील १०० खाटांचा पहिला टप्पा समर्पित कोविड रुग्णालय म्हणून मागील वर्षापासून कार्यरत आहे. रविवारच्या लोकार्पण सोहळ्यानंतर संपूर्ण रुग्णालयाची क्षमता आता ३०० खाटांची झाली आहे. महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये ३ मजले आहेत. त्यामध्ये तळमजल्यावर ५५ खाटा, पहिल्या मजल्यावर ६३ खाटा आणि दुसऱ्या मजल्यावर २ कक्ष प्रत्येकी ४१, अशा एकूण ८२ खाटा आहेत. येथे व्हेंटिलेटरसह अतिदक्षता कक्ष पहिल्या मजल्यावर असून, येथे २२ खाटा आहेत. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी वेगळा अतिदक्षता कक्ष येथे निर्माण करण्यात आला आहे.

----------------------

लिक्विड ऑक्सिजन टँकही बसणार

दुसऱ्या टप्प्यात एकूण ८८८६.८ चौरस मीटर क्षेत्र बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी ८ काेटी २६ लाख ८९२ हजार इतका खर्च करण्यात आला आहे. ऑक्सिजननिर्मितीसाठी इमारतीलगत स्वतंत्र उभारणी करण्यात येणार आहे. येथे मध्यवर्ती ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थाही यासोबत करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ६९ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्रकल्पाची क्षमता १७० जम्बो सिलिंडर प्रतिदिन असणार आहे. याव्यतिरिक्त या ठिकाणी २० किलोमीटर साठवण क्षमता असणारा लिक्विड ऑक्सिजन टँकही बसविण्यात येणार आहे.

Web Title: Another 200 beds available at Mahila Kavid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.