चिपळुणात आणखी एक कोविड तपासणी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:31+5:302021-05-14T04:30:31+5:30

अडरे : चिपळूण नगर परिषदेतर्फे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून आणखी एक कोविड ...

Another Kovid inspection center started in Chiplun | चिपळुणात आणखी एक कोविड तपासणी केंद्र सुरू

चिपळुणात आणखी एक कोविड तपासणी केंद्र सुरू

Next

अडरे : चिपळूण नगर परिषदेतर्फे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून आणखी एक कोविड तपासणी केंद्र शहरातील भाजी मंडईत गाळा क्रमांक ३१ व ३२ येथे सुरू करण्यात आले आहे़

जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या आदेशानुसार चिपळूण नगर परिषद नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी व सर्व सदस्य मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक कोविड तपासणी केंद्र चिपळूणमध्ये सुरू करण्यात आले आहे. महर्षी कर्वे भाजी मंडई येथे गाळा क्रमांक ३१, ३२ मध्ये नव्याने हे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना मोफत कोविडची तपासणी करून मिळणार आहे. चिपळूण शहरातील पवन तलाव मैदान व भाजी मंडई असे दोन कोविड तपासणी केंद्र सुरू आहेत. या तपासणी केंद्रांवर नागरिकांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Another Kovid inspection center started in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.