रत्नागिरीत खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; वारीहून घरी जाताना विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:47 PM2023-02-20T13:47:44+5:302023-02-20T13:51:49+5:30

दुचाकीला जाेराचा दणका बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वर्षा वझे रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला

Another victim claimed by pit in Ratnagiri; Unfortunate death of a married woman on her way home from Wari | रत्नागिरीत खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; वारीहून घरी जाताना विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

संग्रहीत छाया

googlenewsNext

रत्नागिरी : खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वर्षा विलास वझे या विवाहितेचा शनिवारी मृत्यू झाला. निवळी ते जयगड (ता. रत्नागिरी) मार्गावरील तरवळ घाेडखिंड येथे हा अपघात १३ फेब्रुवारी राेजी झाला होता. या अपघातप्रकरणी पती विलास रविचंद्र वझे (६०, रा. सांडेलावगण - वाकणवाडी, जयगड, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विलास वझे पत्नी वर्षा वझे हिला दुचाकी (एमएच ०८ एक्स ०८१७)वरून घेऊन नाणीज (ता. रत्नागिरी) येथे वारीला गेले हाेते. वारी संपवून दाेघे दुचाकीवरून सांडेलावगण येथील घरी निघाले हाेते. निवळी - जयगड मार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली.

दुचाकीला जाेराचा दणका बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वर्षा वझे रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डाेक्याला मागील बाजूला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Another victim claimed by pit in Ratnagiri; Unfortunate death of a married woman on her way home from Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.