महामार्गावरील कशेडी येथे ॲन्टिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:28+5:302021-05-03T04:25:28+5:30
खेड : जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची महामार्गावरील कशेडी तपासणी नाक्यावर १६ एप्रिलपासून ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत या ...
खेड : जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची
महामार्गावरील कशेडी तपासणी नाक्यावर १६ एप्रिलपासून ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत या ठिकाणी ४८१ जणांची तपासणी करण्यात आली असून, १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
या ठिकाणी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात येणाऱ्या ॲन्टिजेन चाचणी तपासणीसाठी आरोग्य विभागातील ३ कर्मचारी, तहसील कार्यालयातील दोन व शिक्षक तैनात आहेत. या ठिकाणी स्वतंत्र बूथ उभारण्यात आला असून, ॲन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तातडीने नजीकच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत या ठिकाणी ॲन्टिजेन चाचणीची मोहीम सुरूच राहणार आहे.
--
khed-photo306 खेड तालुक्यातील कशेडी तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व प्राथमिक शिक्षक तैनात आहेत.