खेडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:18+5:302021-06-09T04:39:18+5:30
खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केले आहे. मात्र, तरीही ...
खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केले आहे. मात्र, तरीही विनाकारण शहर व परिसरात फिरणाऱ्यांची तालुका प्रशासनाने फिरत्या पथकाद्वारे रॅपिड अँटिजन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसात केलेल्या १७७ अँटिजन चाचण्यांमध्ये १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जून रोजी भरणे नाका व महाड नाका येथे ४६ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सुसेरी क्रमांक १ - २, सुसेरी क्रमांक २ - ६ व शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे. दि. ५ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाना - नानी पार्क, भोस्ते व भरणे नाका येथे ६४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी चाकाळे व दाभिळ येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवार, ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व नाना - नानी पार्क तर भोस्ते व भरणे नाका येथे एकूण ६७ जणांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये शहरातील समर्थनगर १ व नांदिवली - बौद्धवाडीतील १ अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.